हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राजगोपालाचारी उद्यानात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात धस यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, खासदार गणेशराव दुधगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, महापौर प्रताप देशमुख, आमदार संजय जाधव, बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. संजय टाकळकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला बंदुकीच्या फेरी झाडून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. धस यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिकांची भेट घेतली. प्रभाकर वाईकर आदी ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिकांसह माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, माजी खासदार शेषराव देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. व्ही. निला, जिल्हा नियोजन अधिकारी ना. गो. पंतगे तसेच आर. डी. देशमुख आदी उपस्थित होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा महत्त्वपूर्ण – पाटील
वार्ताहर, लातूर
हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्यसनिक व हुतात्म्यांनी दिलेल्या लढय़ाचे मोल मोठे आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी दिलेला लढा महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
हुतात्मा स्मारक टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पाटील बोलत होते. महापौर स्मिता खानापुरे, खासदार जयवंत आवळे, आमदार वैजनाथ िशदे, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर यांची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस पथकाने मानवंदना देत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिकांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, की हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा स्वातंत्र्यसनिकांनी तेजस्वीपणे लढला. हा लढा केवळ संस्थानाच्या विलीनीकरणाचा नव्हता, तर देशाच्या अखंडतेचा होता. मुक्तिसंग्रामासाठी स्वातंत्र्यसेनानींनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्याची जाणीव ठेवून मराठवाडय़ातील सामाजिक, आíथक, शैक्षणिक, सांस्कृतिक, शेतीविषयक सर्वागीण प्रगतीसाठी सर्वाच्या सहकार्यातून विकासाकडे वाटचाल करू, असे पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस पथकाने सलामी दिली.
मुक्तिदिनानिमित्त जालन्यात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार
वार्ताहर, जालना
हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त येथील टाऊन हॉल परिसरातील हुतात्मा स्तंभाजवळ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी टोपे व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल घुगे, खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई भुतेकर, नगराध्यक्षा पद्माताई भरतिया, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख यांच्यासह जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची उपस्थिती या वेळी होती. मुक्तिदिनाच्या पूर्वसंध्येला चेतना ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. सुखलाल कुंकलोळ, वसंतराव सेलगावकर, बाबुराव वाघमारे, श्रीरंग लोखंडे, किसनप्रसाद देवीदान यांचा सत्कारमूर्तीत समावेश होता. संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र सोनी अध्यक्षस्थानी होते. शिवप्रसाद लोया यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.