04 June 2020

News Flash

आपण ‘दांडीबहाद्दर’नाही

मनसेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवकपद अवैध ठरविण्यात आल्याने त्या २०१४-१५ या वर्षांत पालिका सभागृहात उपस्थित नव्हत्या.

| July 21, 2015 06:47 am

मनसेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवकपद अवैध ठरविण्यात आल्याने त्या २०१४-१५ या वर्षांत पालिका सभागृहात उपस्थित नव्हत्या. ‘मुंबई वृत्तान्त’च्या १० जुलैच्या पुरवणीमध्ये ‘नगरसेवकही दांडीबहाद्दर!’ या वृत्तात शृंगारे यांच्या नावाचा चुकून उल्लेख झाला आहे. दक्षता समितीच्या अहवालावरून प्रकरण न्यायप्रविष्ट झालेले असताना आपले नगरसेवकपद २७ मार्च २०१४ रोजी संपुष्टात आणण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर १० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे नगरसेवकपद अबाधित राखण्यात आले, मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान आपण नगरसेविका नव्हतो. त्यामुळे आपण दांडीबहाद्दर नगरसेविका होऊ शकत नाही, असा खुलासा मनसेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2015 6:47 am

Web Title: i didnot took leave priyanka shrungare
टॅग Mns
Next Stories
1 उपचार विलंबाची स्वाइन फ्लूला ‘साथ’
2 अभाविपच्या फलकबाजीवरून विद्यापीठात वाद
3 मोबाइल किंवा सिम बदलल्यास अ‍ॅप डाउनलोडची समस्या
Just Now!
X