24 November 2017

News Flash

इरफान म्हणतो, लूक्स बदलायला आवडतं

बॉलिवूडमध्ये अभिनय जमो अथवा न जमो, स्वत:च्या ‘लूक’बाबत अत्यंत काळजी घेणारे तारे-तारका अनेक आहेत.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 15, 2013 1:15 AM

बॉलिवूडमध्ये अभिनय जमो अथवा न जमो, स्वत:च्या ‘लूक’बाबत अत्यंत काळजी घेणारे तारे-तारका अनेक आहेत. पण आता कसदार अभिनय करणाऱ्यांनाही या इंडस्ट्रीत ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’ला जास्त महत्त्व आहे, ही गोष्ट पटू लागली आहे. कोंकणा सेन, तब्बू यांसारख्या तारकांबरोबरच इरफान खान हा गुणी अभिनेताही ही गोष्ट पक्की अंगी बाणवत आहे. भूमिकेला आपल्या अभिनयाद्वारे वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा इरफान आपल्या ‘लूक’बद्दलही तेवढाच काटेकोर आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक चित्रपटात भूमिकेच्या गरजेनुसार लूक बदलण्यात त्याला कमालीचे स्वारस्य आहे. इरफानचा ‘साहेब, बिबी और गँगस्टर रिटर्न्‍स’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून यात त्याने राजघराण्याशी संबंध असलेल्या गँगस्टरची भूमिका केली आहे. साहजिकच या चित्रपटात तो काहीसा राजेशाही थाटात वावरला आहे. ‘पानसिंग तोमर’ या चित्रपटात बारीक केस वगैरे ठेवलेला इरफान या चित्रपटात केस वाढवलेला, कानात सोन्याचे डूल वगैरे घातलेला अशा अवतारात दिसेल. ‘आपल्या दिसण्यातूनच आपले राजघराण्याशी असलेले संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत, असा माझा हट्ट होता. त्यानुसारच मी माझ्या लूकवर मेहेनत घेतली आहे,’ इरफानने सांगितले. आपल्याला आपल्या प्रत्येक भूमिकेवर सर्वच अंगांनी मेहेनत घ्यायला खूप आवडते. लूक हा त्यातीलच एक भाग असतो. आता प्रत्येकालाच आपण दर वेळी थोडेसे वेगळे दिसावे असे वाटत असतेच, असेही इरफान सांगतो.

First Published on February 15, 2013 1:15 am

Web Title: i like to change the looksays irfan
टॅग Bollywood,Irfan Khan