News Flash

शेतीपयोगी गोष्टींचा काळाबाजार रोखला- मंत्री विखे

उत्पादन खर्च वाढविणाऱ्या शेतीपयोगी अनुषांगिक गोष्टींचा काळाबाजार रोखू शकलो ही कृषि खात्याची मोठी उपलब्धी असल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

| September 15, 2013 01:36 am

धान्य आणि फळ महोत्सवाच्या माध्यमातून उत्पादक ते ग्राहक  या चळवळीला मोठी उभारी मिळाली आहे. उत्पादन खर्च वाढविणाऱ्या शेतीपयोगी अनुषांगिक गोष्टींचा काळाबाजार रोखू शकलो ही कृषि खात्याची मोठी उपलब्धी असल्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
प्रवरानगर येथे आयोजित करण्या आलेल्या पॉलिहाऊस व शेडनेट भाजीपाला उत्पादन शेतकरी कार्यशाळेचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के , विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सातत्य नाही. त्याच्या मालाची किंमतही तो ठरवू शकत नाही. कृषी विद्यपीठांच्या माध्यमातून फक्त उत्पादन काढण्याचे शिकवले गेले. परंतू आत्मविश्वास न वाढविल्याने उत्पादन क्षमता असूनही शेतीमालाला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी खचत गेला. सरकारनेही सर्व योजना शेती उत्पादन वाढविण्यासाठीच खर्ची घातल्या. म्हणूनच आपण मालाची विक्री करण्याचे अधिकार शेतकऱ्यालाच असावे यासाठी धोरण घेऊन थेट विक्री व्यवस्था निर्माण केली. वर्षांनुवर्षे व्यापारी हित पाहणाऱ्या बाजार समित्या या काळात साठवणूक क्षमताही निर्माण करु शकल्या नाहीत. म्हणूनच आपण भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट मागतील तेथे ग्रेडींग आणि पॅकिंगची व्यवस्था निर्माण करण्याचे आपले प्रयत्न करत असून, पुढे येणाऱ्या तरुण शेतकरी गटांना सर्वतोपरी मदत करू असे ते म्हणाले.  
आण्णासाहेब म्हस्के, पुणे येथील अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडखे, नायगाव येथील शेतकरी शैलश खाटेकर, खंडाळा येथील मदन चौधरी, महेंद्र चौधरी यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश भाने यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्षनाथ लोखंडे यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:36 am

Web Title: i stopped black market of components used for agriculture radhakrishna vikhe
Next Stories
1 नक्षलवाद रोखण्यास उपजीविका देणारे शिक्षण हवे – वळसे
2 निर्धार परिषदेच्या फलकांबद्दल पानसरेंसह दीडशे जणांना नोटीस
3 ‘भारतीय कालगणनेचा प्रभाव समाजाला नैतिकतेकडे नेणारा’
Just Now!
X