24 September 2020

News Flash

दिलीप सोपलरूपी रामाला लक्ष्मणाप्रमाणे साथ देणार-ढोबळे

राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या फेरबदलात घरचा रस्ता पाहावा लागलेले सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पक्षाचा आदेश स्वीकारत यापुढे पक्षाचा शिपाई म्हणून काम करण्याचे ठरविले

| June 13, 2013 01:59 am

राज्य मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या फेरबदलात घरचा रस्ता पाहावा लागलेले सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पक्षाचा आदेश स्वीकारत यापुढे पक्षाचा शिपाई म्हणून काम करण्याचे ठरविले आहे. बार्शीचे दिलीप सोपल यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर आता आपण सोपल यांच्या रामाला लक्ष्मणाप्रमाणे साथ देणार असल्याचेही प्रा. ढोबळे यांनी नमूद केले आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात प्रा. ढोबळे यांनी, आपणास गेली चार वर्षे मंत्रिमंडळात काम करण्याची संधी पक्षाकडून मिळाली. यापूर्वी पक्षाने पाच वेळा मंत्रिपद दिले. आता मंत्रिमंडळातून कमी केल्याचे दु:ख नसल्याचे म्हटले आहे. यापुढे आपण पक्षाचा सामान्य शिपाई म्हणून काम करणार आहोत. पक्षाच्या वाढीसाठी व संघटन भक्कम होण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे काम दलित, अल्पसंख्याक, ओबीसी व भटक्या विमुक्तांपर्यंत वाढविण्यासाठी तसेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विचार सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण झटणार आहोत, असे प्रा. ढोबळे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2013 1:59 am

Web Title: i will give support to dilip sopal laxman dhoble
Next Stories
1 ‘डॉ. आहेर’च्या विद्यार्थ्यांकडून काजू कटिंग यंत्राची निर्मिती
2 सोलापुरात दुचाकीच्या डिकीतून अडीच लाखांची रक्कम लंपास
3 कराड, पाटण तालुक्यांतील पावसाचा जोर ओसरला
Just Now!
X