28 February 2021

News Flash

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक

शासकीय कार्यालयात काम करीत असताना सर्वसामान्य नागरिकांना कर्मचाऱ्यांची ओळख पटावी

| May 13, 2014 07:50 am

शासकीय कार्यालयात काम करीत असताना सर्वसामान्य नागरिकांना कर्मचाऱ्यांची ओळख पटावी, याकरिता मुख्य सचिवांसून तर शिपायापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम करताना ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी अशा आशयाचे परिपत्रकच जारी केले आहे.
शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या कामाने नागरिक येत असतात. त्यांना त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे, पद याची माहिती व्हावी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचांऱ्यांना ओळखपत्र असणे जारी केले आहे. मात्र, अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र वापरत नाही. पर्यायाने त्यांची ओळख पटविण्यास अडचण येते. अधिकारी व कर्मचारी आहे असे सांगून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार होत असतात. एखाद्या जागरूक नागरिकाने ओळखपत्राची मागणी केल्यास ते दाखविले जात नाही. हा मुद्दा विधान सभा व विधान परिषदेत चांगलाच गाजला होता. याची आता सामान्य प्रशासन विभागाने दखल घेऊन सर्वानाच ओळखपत्र वाळगणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. जेणेकरून ते नागरिकांना दिसेल आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यास मदत होईल. यात कोणी कुचराई केली तर अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्या जाईल, असे निर्देश जारी केले आहेत
 या निर्णयामुळे संबंधित अधिकाऱ्यांची ओळख पटेल. नागरिक आपले काम थेट संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे कामे सांगतील, असे कास्ट्राईब  जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सोहन चवरे यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2014 7:50 am

Web Title: id required to public servants employees
टॅग : Nagpur
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्य़ात सात महिन्यांमध्ये १९५ बालकांचा उपजत मृत्यू
2 पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली देऊळगावराजा तालुक्यात फसवणूक
3 पिवळी नदी स्वच्छता मोहीम जोरात
Just Now!
X