शिक्षणक्षेत्रात अध्यापनासह विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी आचार्य अत्रे मंदिर नाटय़गृह, कल्याण येथे होणार आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळा- १) अस्मिता आठवले (मुख्याध्यापिका, लालबहादूर शास्त्री शाळा क्र. १, आयरे डोंबिवली-पूर्व), लता फुलसुंदे (सहशिक्षिका-गोदाताई परुळेकर प्राथ. शाळा क्र. ६, खडेगोळवली), प्रवीण धोडी (सहशिक्षिका-लोकमान्य टिळक प्राथ. शाळा क्र. २०), विनय धात्रक (मुख्याध्यापक-चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली), विवेकानंद बागवे (सहशिक्षक-बालविकास जवाहर विद्यामंदिर, कल्याण-प.), अस्मिता माळी (सहशिक्षिका- श्रीगजानन विद्यालय, कल्याण-प) तसेच कावेरी दीपक भंडारी (वासुदेव बळवंत फडके मनपा शाळा क्र. ४१, गोळवली) व प्राजक्ता माने (संत ज्ञानेश्वर मनपा शाळा क्र. ६०, मांडा) यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार जाहीर झाला आहे.
आचार्य भिसे मनपा. शाळा क्र. ६२ पाथर्ली, डोंबिवली (पू) व छत्रपती शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय, तिसगांव, कल्याण यांना आदर्श शाळा पुरस्कार तसेच बंदेअली खॉँ मनपा प्राथमिक शाळा क्र. ९९/१२ बनेला कल्याण पूर्व या शाळेला आदर्श पटनोंदणी शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा