भंडारदरा व निळवंडे धरणातील पाणी जायकवाडी धरणात पुन्हा सोडल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफइंडियाच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावा घातला जाईल, असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी दिला.
कापसे यांनी म्हटले आहे की, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाण्यावर प्रथम नगर जिल्ह्याचा हक्क आहे. पाणी ही नैसर्गिक संपत्ती असली तरी यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने या दोन्ही धरणांतील पाणी उत्तर नगर जिल्हास पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच नगर जिल्ह्यातील सर्व बंधारे व तळे अजूनही कोरडेठाक आहेत. खळखळणारे ओढेनाले वाहत नसल्याने विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे रब्बी पिकांच्या आशा मावळत्या आहेत. हिवाळ्यामध्ये पाण्याची ही अवस्था, तर उन्हाळ्यामध्ये काय होईल याची कल्पना न केलेली बरी म्हणून पुन्हा आगामी काळात भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडी धरणास पाणी सोडल्यास त्यास रिपाइंचा पूर्णपणे विरोध राहील.
उत्तर नगर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठीच वापर होऊन बंधारे व गावतळे त्वरित भरण्यात यावेत व उन्हाळ्याकरिता भंडारदरा
व निळवंडे धरणाचा पाण्याचा साठा राखीव ठेवण्यात यावा, असेही
त्यांनी म्हटले आहे.