08 August 2020

News Flash

सावरकरनगरमधील अनैतिक व्यवसाय उघड

काही दिवसांपूर्वी शहरातील कुणाल हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले असताना उच्चभ्रु वसाहतीतही हे प्रकार बिनभोबाटपणे सुरू असल्याचे पुढे आले आहे.

| June 16, 2015 02:55 am

काही दिवसांपूर्वी शहरातील कुणाल हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले असताना उच्चभ्रु वसाहतीतही हे प्रकार बिनभोबाटपणे सुरू असल्याचे पुढे आले आहे. सावरकरनगर परिसरात हेअर डॉट कॉम सलून या ठिकाणी मसाज करण्याच्या नावाखाली कामाला ठेवून दोन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांची सेवा असणाऱ्या अलिशान केश कर्तनालयात असे काही प्रकार याआधी उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरील कुणाल हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. बनावट गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी खातरजमा करत हॉटेलवर छापा टाकला होता. त्यावेळी महिलांसह या ठिकाणी आलेल्या अनेकांना अटक झाली होती. उपरोक्त हॉटेल अनेक वर्षांपासून या कारणावरून कुप्रसिध्द आहे. परंतु, इतर भाग अशा अनैतिक व्यवसायापासून अपवाद राहिले नसल्याचे निदर्शनास आले आहे. गंगापूर रस्त्यावरील सावरकरनगर हा उच्चभ्रु वसाहतीचा परिसर. येथील गणेश ग्लोरी अपार्टमेंटमध्ये राऊ उर्फ तुळशीराम चांगदेव वैद्य याच्या मालकीचे हेअर डॉट सलुन आहे. सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात मसाज करण्याच्या कामासाठी मालकाने सिडकोतील दोन महिलांना कामावर ठेवले होते. नंतर त्याने त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. ही बाब निदर्शनास आल्यावर वैद्यविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2015 2:55 am

Web Title: illegal activities in sawarkar nagar exposed
Next Stories
1 वाईट हवामानामुळे नाशिक-पुणे विमानसेवेचा मुहूर्त हुकला
2 कांदा चाळ अनुदानासाठी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक
3 लासलगावमधून भरदिवसा १४ लाखांची रोकड लंपास
Just Now!
X