गंगाखेडहून लातूरकडे चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळूच्या सहा मालमोटारी अंबाजोगाई शहर पोलिसांनी पकडल्या. गाडय़ांचे चालक पळून गेले.
गंगाखेडहून लातूरकडे या गाडय़ांमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याला मिळाली. पोलीस निरीक्षक सतीश बनसोडे, उपनिरीक्षक आसेफ खान, उस्मानखान पठाण यांच्या पथकाने अंबाजोगाई बायपासला सापळा रचून या गाडय़ा पकडल्या. सीएच ००४, सीए २३८७, एमएच २३/१११०, एमएच २३ बी ६८८२, एमएच ४४/७४७२, एमएच २४ ९८१७ व एमएच ०४ ७१५८ या गाडय़ा ताब्यात घेतल्या. जप्त करतेवेळी प्रत्येक गाडीत ३० ब्रास वाळू होती. याची किंमत ३१ लाख ८० हजार रुपये आहे. या प्रकरणी अंकुश राम ईटकर, चनई, शेख गफूर शेख मलिक (वडारवाडा, अंबाजोगाई), सुंदर बाळासाहेब केकाण (योगेश्वरी कॉलनी, अंबाजोगाई), मोहन नारायण गाडेकर (धायगुडा, अंबाजोगाई) व दत्ता भगवान माने (साठेनगर, अंबाजोगाई) या सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला.