भारनियमन मुक्तीचा दावा महावितरणकडून करण्यात येत असला तरी शहरातील काही भागांमध्ये आठवडय़ातील ठराविक दिवशी नियमितपणे अचानक कधीही वीज गायब होण्याचे प्रकार सुरूच असून हे कमी म्हणून की काय पंचवटीतील अमृतधाम परिसरात सध्या कमी-अधिक दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तु जळण्याचा धोका निर्माण झाला आहे.  अमृतधाम परिसरातील लक्ष्मीनगर, शारदा हौसिंग सोसायटी, औदुंबरनगर या भागात अपवाद वगळता दर शनिवारी तीन ते चार तास वीज गायब होते. वीज गायब होण्याचे हे प्रमाण इतके नियमित आहे की जणू अप्रत्यक्षरित्या महावितरणने भारनियमन सुरू केले आहे की काय असे वाटावे. या अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या भारनियमनाची परिसरातील नागरिकांनीही सवय करून घेतली. त्यामुळे महावितरणने आता नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहात दोन दिवसांपासून कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा सुरू केला आहे. शनिवारी रात्रभर कमी-अधिक दाबाने होणाऱ्या वीज पुरवठय़ाचा खेळ सुरू होता. शहरात याआधीही काही ठिकाणी कमी-अधिक दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठय़ाने घरांमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून हजारो रूपयांचे नुकसान झाले होते. तशाच प्रकारचा धोका उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील नागरिक भयभीत आहेत. त्यामुळे महावितरणने त्वरीत हा खेळ थांबविण्याची आणि नियमितपणे वीज पुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत