ऐन उन्हाळ्यात प्रवासाची गरज व गर्दीचा फायदा दलाल नेमका उचलतात आणि प्रवाशांची लूट होते. ते टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यंदा पावले उचलली असून विविध गाडय़ांमध्ये दररोज ‘तत्काल कोटा’ उपलब्ध करून दिला आहे.
या ‘तत्काल कोटय़ा’चा लाभ प्रवासी प्रवासाच्या एक दिवस आधी घेऊ शकतील. विदर्भ एक्सप्रेसमध्ये ‘तत्काल कोटय़ा’त २३१ बर्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात वातानुकूलित द्वितीय २२, वातानुकूलित तृतीय ६१, शयनयान १३८चा समावेश आहे. सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये ‘तत्काल कोटय़ा’त ३५३ बर्थ उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १०, वातानुकूलित तृतीय ४८ व १९५ शयनयानचा समावेश आहे. मुंबई दूरांतो एक्स्प्रेसमध्ये ३३९ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय ३०, वातानुकूलित तृतीय ८०, २२९ शयनयानचा समावेश आहे. नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये ३१२ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १०, वातानुकूलित तृतीय ६४, २३८ शयनयानचा समावेश आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित तृतीयमध्ये २५६ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध आहेत. नागपूर-मुंबई विशेष गाडीत ३०७ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १५, वातानुकूलित तृतीय ३२, २६० शयनयानचा समावेश आहे.
अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये २३७ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १०, वातानुकूलित तृतीय ३२, १९५ शयनयानचा समावेश आहे. अजनी एलटीटी एक्स्प्रेसमध्ये १८८ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १०, वातानुकूलित तृतीय ४८, १३० शयनयानचा समावेश आहे. मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये १७६ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय २, वातानुकूलित तृतीय ३०, १४४ शयनयानचा समावेश आहे. नागपूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये १६४ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १०, वातानुकूलित तृतीय १६, २३८ शयनयानचा समावेश आहे. नागपूर- सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये १९८ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय १०, वातानुकूलित तृतीय १६, १७२ शयनयानचा समावेश आहे.
हैदराबाद-निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये १७७ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात एसी वातानुकूलित १०, वातानुकूलित तृतीय १६, १५१ शयनयानचा समावेश आहे. हैदराबाद-नवी दिल्ली आंध्र प्रदेश एक्स्प्रेसमध्ये ३४८ बर्थ ‘तत्काल’मध्ये उपलब्ध असून त्यात वातानुकूलित द्वितीय २४, वातानुकूलित तृतीय ६४, २६० शयनयानचा समावेश आहे. ‘तत्काळ कोटय़ा’तून आरक्षणासाठी मूळ भाडय़ाच्या तीस टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. शयनयानचे किमान ९० तर कमाल १७५ रुपये, वातानुकूलित द्वितीयचे कमाल ३०० तर कमाल ४०० रुपये, वातानुकूलित तृतीयचे किमान २५० तर कमाल ३५० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ‘तत्काल कोटय़ा’ची माहिती नसल्याने एक दिवस आधी आरक्षण करण्याऐवजी प्रवासी दलालांच्या दारी जातात. दलाल प्रवाशांच्या गरजेचा अचूक लाभ घेत प्रवाशांची लूट करतात. त्यामुळे प्रवाशांनी या ‘तत्काल कोटय़ा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले आहे.