सोलापूर जिल्हय़ात राज्यात सर्वाधिक ५५३ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, जिल्हय़ात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टँकरच्या संख्येतही आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सध्या जिल्ह्य़ात ५५३ टँकरद्वारे ११ लाख ३५ हजार ५३० लोकसंख्येच्या ४४७ गावे व २२०० वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात आहे. अर्थात, सर्वाधिक टँकरची संख्या सांगोला तालुक्यात आहे. या ठिकाणी ८५ टँकर लागत आहेत. अन्य तालुकानिहाय टँकरचा होत असलेला वापर असा: माढा-८५, करमाळा-७४, पंढरपूर-७३, मंगळवेढा-६८, मोहोळ-६१, अक्कलकोट-२४, माळशिरस-२४, बार्शी-२१, उत्तर सोलापूर-२१ व दक्षिण सोलापूर-२०. पाणीपुरवठय़ासाठी ५३७ खासगी तर १६ शासकीय टँकरचा उपयोग केला जात आहे. तर आतापर्यंत पाण्यासाठी २४४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:59 am