19 September 2020

News Flash

उद्योगांविषयी महिला रोजगार परिषदेत मार्गदर्शन

उपलब्ध असलेले उद्योग, प्रशिक्षण अभ्यासक्रम याविषयी येथील रोटरी क्लब सभागृहात अश्वमेध संस्थेने आयोजित महिला रोजगार परिषदेत माहिती देण्यात आली.

| December 12, 2012 12:10 pm

उपलब्ध असलेले उद्योग, प्रशिक्षण अभ्यासक्रम याविषयी येथील रोटरी क्लब सभागृहात अश्वमेध संस्थेने आयोजित महिला रोजगार परिषदेत माहिती देण्यात आली.
परिषदेचे उद्घाटन करताना आमदार वसंत गिते यांनी महिलांच्या रिकाम्या हाताला काम मिळवून दिल्यास त्या उद्योजिका बनतील, त्यातूनच समाजाचा विकास होईल, असे सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्र, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, यासारख्या संस्थांच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण व अर्थसहाय्य मिळते. याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. परिषदेस महाराष्ट्र बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक सदाशिव पाटील यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने १५ प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रम  मोफत उपलब्ध असल्याची माहिती दिली. तर बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक वैशाली देशमुख यांनी बचत गट संकल्पनेची माहिती दिली. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राहुल गुजराथी यांनी कचरा मुक्त अभियानातंर्गत ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक, कचरा मुक्त नाशिक सुंदर नाशिक’ स्वच्छतारक्षक म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. सोनाली तेजाळे यांनी मार्केट इंडिया संकल्पनेतंग्र्ांत बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचे तर, खादी ग्रामोद्योगचे विकास अधिकारी विकास वीर यांनी खादी ग्रामोद्योगच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. या रोजगार परिषदेचे प्रास्तविक अश्वमेधचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी केले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:10 pm

Web Title: in women employment meet guied conduct on trade
टॅग Trade
Next Stories
1 रॉकेल वितरकांसह स्वस्त धान्य दुकानदारांचा मोर्चा
2 सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचे उद्घाटन
3 पाचोऱ्याच्या दीपची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका
Just Now!
X