पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. गेल्या १५ दिवसांत उरणमध्ये ५७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रानसई धरणातील पाणीसाठय़ात वाढ होऊन पाण्याची पातळी ९८ फुटांवर आली आहे. उरण तालुक्यात २५ ग्रामपंचायती तसेच येथील औद्योगिक क्षेत्राला एमआयडीसीच्या रानसई येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणीसाठवण क्षमता एक हजार कोटी (१० दशलक्ष घन मीटर) लीटर्स आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात हे काम होऊ शकणार नाही.  सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान,  गेल्या १५ दिवसांपासून येथे चांगला पाऊस पडत आहे. उरणमध्ये आतापर्यंत ५७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची गती अशीच राहिली तर लवकरच रानसई धरण भरून वाहू लागेल अशी आशा उरण एमआयडीसीचे उपअभियंता एम.के. बोधे यांनी व्यक्त केली आहे.