नॅचरल शुगरने केलेले जलसंधारणाचे काम कौतुकास्पद असल्याचे पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या कारखान्याच्या विविध उपक्रमांची चाकूरकर यांनी पाहणी केली. चालू हंगामातील उत्पादित ४ लाख २५ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन चाकूरकरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपाल पाटील म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ातील लोकांकडून ठोंबरे यांच्या कार्याबद्दल आम्ही नेहमी ऐकत असतो. असे आदर्श काम कसे झाले? हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच लक्षात आले. साखर उद्योग खुला झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात कारखाने उभे राहिले. चांगल्या चालणाऱ्या कारखान्यात नॅचरल शुगरचे नाव अव्वल असल्याचे ते म्हणाले. नॅचरल शुगरने यापुढे सौरऊर्जा निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, डॉ. सुभाष वट्टे, संजय पाटील दूधगावकर, एस. एल. हरिदास, डॉ. मोतीपवळे आदी उपस्थित होते. बी. बी. ठोंबरे यांनी प्रास्ताविक, तर पांडुरंग आवाड यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप भिसे यांनी आभार मानले.