इनरव्हील क्लब व भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने डेंग्यू आजाराविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
डॉ. लोकेंद्र महाजन आणि डॉ. नरेंद्र शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी भगिनी मंडळ अध्यक्षा डॉ. सुशिलाबेन शहा होत्या.  पाहुण्यांचा सत्कार क्लबच्या अध्यक्षा आरती जैन, सचिव अश्विनी गुजराथी यांनी केले. डॉ. महाजन यांनी डेंग्यूची लक्षणे व उपाय सांगितले. डेंग्यूमुळे ताप, चट्टे येणे, मळमळ व उलटी होणे, अंग खूप दुखणे, पोट दुखणे, रक्तस्त्राव होणे, पांढऱ्या पेशी कमी होण्याच्या तक्रारी जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना केली. डॉ. शिरसाठ यांनी डासांची उत्पत्ती रोखण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी नागरिकांमध्ये जागृती आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. स्मिता महाजन, राजकुमारी अग्रवाल, संध्या शहा, सरला राजपूत, उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. बी. पाटील यांनी केले. आभार क्लबच्या अध्यक्षा आरती जैन यांनी मानले.