जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वजदिन २०१२ निधी संकलन मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल किशोर पेटकर, विंग कमांडर एल. बी. वाघ, कॅप्टन अजित ओढेकर उपस्थित होते. ध्वजनिधी संकलनाचे पुढील वर्षांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले जाईल, तसेच आगामी वर्षांत निधीमध्ये २० ते २५ टक्के वाढ करण्याचा मानस यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. माजी सैनिकांना नोकरीसाठी शस्त्र परवान्याची आवश्यकता असल्यास त्यांना शस्त्र परवाने तात्काळ उपलब्ध करून दिले जातील, याशिवाय माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा व त्यांच्या कुटुंबीयांना जमीन, शेती व शिक्षण या संदर्भात काही अडचणी असल्यास त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी सैनिकांनी आपल्या अडचणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनात लेखी स्वरूपाचा अर्ज सादर करावा. त्यावेळी सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
या वर्षी नाशिक जिल्ह्य़ाने ८३.१३ टक्के निधी संकलित केला असून उर्वरित निधी १० दिवसांत जमा करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.
ध्वजदिन वर्ष २०११ मधील उत्कृष्ट निधी संकलनासाठी नाशिक विभागाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच माजी सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नीचा यावेळी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी स. ला. सोनवणे यांनी आभार मानले.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…