News Flash

‘निर्मल उज्ज्वल’च्या भंडारा शाखेचे उद्घाटन

‘निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या भंडारा येथील २९व्या शाखेचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजीमंत्री नाना पंचबुद्धे होते. सोसायटीचे संस्थापक व सचिव

| December 14, 2012 01:54 am

‘निर्मल उज्ज्वल’च्या भंडारा शाखेचे उद्घाटन

‘निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या भंडारा येथील २९व्या शाखेचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजीमंत्री नाना पंचबुद्धे होते. सोसायटीचे संस्थापक व सचिव प्रमोद मानमोडे, भंडारा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष रुबिजी चढ्ढा, भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकचे उपाध्यक्ष बच्चू वैरागडे, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव उरकांदे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भंडाऱ्यातही ‘निर्मल नगरी’ स्थापन करावी, अशी अपेक्षा व्यक्ती केली. सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत, असे आमदार भोंडेकर म्हणाले. ‘निर्मल उज्ज्वल’सोबतच भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकही विकसित करू, असा विश्वास प्रमोद मानमोडे यांनी व्यक्त केला. यावेळी पाहुण्यांची भाषणे झाली. भंडाऱ्यात ‘निर्मल नगरी’ स्थापन करण्यात येईल, असे वसंत उरकांदे म्हणाले. कार्यक्रमाला सत्यंजय त्रिवेदी, वामन भलवतकर, अरिवद कुकडे, विठ्ठलराव गावंडे, प्रदीप राऊत, धनराज धकाते, निर्मला मानमोडे व आशा गोहणे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2012 1:54 am

Web Title: innogration of new branch of nirmal ujwal in bhandara
टॅग : Bhandara
Next Stories
1 सोयाबीन व्यापाऱ्याचा खून, पत्नी, मुलीही गंभीर जखमी
2 भंडारा जिल्ह्य़ात ३०३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदत १०४ जणांनाच
3 अकोला विमानतळ विस्तारीकरण; भूसंपादन प्रस्तावांची छाननी
Just Now!
X