News Flash

सानपाडय़ात साकारणार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सानपाडय़ात आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यास येणाऱ्या वित्तीय खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

| January 13, 2015 08:57 am

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सानपाडय़ात आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यास येणाऱ्या वित्तीय खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सानपाडा, सेक्टर २५ येथील गणेश मदानात आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधण्याच्या कामासाठी अंदाजपत्रक व नकाशे तयार करण्यात आले असून एकूण अंदाजे ७० लाख ५२ हजार ३७६ रुपये खर्च प्रस्तावित आहे.
इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या बांधकाम नकाशांना नगररचना विभागाची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. सुमारे १६९ चौ.मी. क्षेत्रफळात या संकुलाचे बांधकाम होणार आहे. पहिल्या मजल्यावर विविध खेळांसाठी हॉल व शौचालयाची सुविधा तसेच १३० मी. लांब व २२५ मी.मी. व्यासाची मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अंदाजपत्रकीय खर्च ७.५ लाख असून यामध्ये ५ टक्के आकस्मित खर्च, १५ टक्के वित्तीय खर्च व ४ टक्केवास्तुविशारद खर्च समाविष्ट केले असून या कामासाठी १२ महिन्यांचा कालावधी निर्धारित केला आहे. या क्रीडा संकुलामुळे नवी मुंबईतील खेळाडूंना वाव मिळणार आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:57 am

Web Title: international sports complex in sanpada
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 ऐरोली येथील आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्राचा प्रकल्प गुंडाळणार
2 राज्य नाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात होणार
3 महावितरणच्या गलथानपणामुळे उरणकर यमदूतांच्या छायेत
Just Now!
X