आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाचा कालवा फोडल्याने हतबल झालेल्या पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्ताशिवाय पाणी सोडण्यास नकार दिला आहे. रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी दिघंची परिसरातील कार्यकत्रे गुरुवारी आटपाडी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येते. २५ किलोमीटर कालव्यावर आटपाडी तालुक्यातील दिघंची, िलगीवाडी, राजेवाडी, पुजारवाडी आदी भागाला लाभ होतो.  तर सर्वाधिक लाभ सांगोला तालुक्यातील मसूद, खवासपूर या गावातील शेतीला होतो.  सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी क्षेत्राला या कालव्याचा प्रत्यक्ष लाभ होत आहे.
राजेवाडी तलाव आटपाडी तालुक्यात असल्याने या तलावातील पाणी आटपाडीलाच मिळावे अशी भूमिका घेऊ न गेल्या आठवडय़ात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी कालवा फोडून पाणी माणगंगा नदीकडे वळविले होते. कालवा फोडल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी बंद करून ८ शेतक-यांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान करून पाणी चोरी केल्याबद्दलचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.  कालवा फोडल्यामुळे ४० हजारांचे नुकसान झाल्याची तक्रारही देण्यात आली आहे.
कालवा फोडल्यामुळे हतबल झालेल्या पाटबंधारे विभागाने राजेवाडी तलावातील पाणी सोडण्यास असमर्थता दर्शविली आहे.  त्यामुळे आटपाडी तालुक्याच्या पूर्व भागातील दिघंची परिसरात रब्बी पिकाला पाणी उपलब्ध नाही. या कालव्यातून पुन्हा पाणी सोडावे या मागणीसाठी दिघंचीचे उपसरपंच हणमंतराव देशमुख, राजकुमार पडळे, संपत ढोले, नीलेशे ढोले आदी कार्यकत्रे गुरुवारी धरणे आंदोलन करणार आहेत.
 करणे आवश्यक झाले आहे. पर्यटकांकडून बेजबाबदारपणे टाकला जाणारा प्लॅस्टिकचा व इतर कचरा हीदेखील नवी समस्या होऊन बसली आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा हा अमूल्य ठेवा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.