हौशी नाटय़कलावंत, दिग्दर्शक आणि लेखक जगतकुमार पाटील यांचे अलीकडेच निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व कन्या असा परिवार आहे.
आठ दिवसांपूर्वी ते राईगाव (भाईंदर) येथे एका नातेवाईकाकडे अन्त्यविधीसाठी गेले होते. तेथून परतताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकलने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचे पायाचे हाड मोडले व डोक्याला गंभीर मार बसला. त्यांचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू आला. अभिनव विद्यामंदिरचे ते सेक्रेटरी होते.