News Flash

दाम्पत्याला लुटणाऱ्या तिघांना सक्तमजुरी

प्रवासी दाम्पत्यास मारहाण करून त्यांचे २३ लाख रूपयांचे दागिने लुटून चारचाकी वाहन पळवणाऱ्या तिघांना न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. चास शिवारात ६ मे २०१२

| January 17, 2013 03:54 am

प्रवासी दाम्पत्यास मारहाण करून त्यांचे २३ लाख रूपयांचे दागिने लुटून चारचाकी वाहन पळवणाऱ्या तिघांना न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. चास शिवारात ६ मे २०१२ रोजी रात्री ही लुटमार झाली होती. यातील एक आरोपी फरार आहे, तर दुसऱ्याची निर्दोष सुटका झाली.
संजय रामदास पवार (वय, २८ रा. पोलीस कॉलनी, बीड), साजीद इक्बाल शेख (वय, २८. रा. लाटेआळी, बीड), सद्दाम शफीक शेख (वय, २१, रा. शिरूर, पुणे) यांना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. चौथा आरोपी अतुल विठ्ठल वाघमारे (वय, २९, रा. शिवाजीनगर, बीड) याची संशयाचा फायदा मिळून निदोर्ष सुटका झाली, तर पाचवा नाव माहिती नसलेला आरोपी अद्याप फरार आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून सुरेश लगड यांनी काम पाहिले.
प्रशांत रामचंद्र गायकवाड (वय, ४५ ) व त्यांच्यी पत्नी शर्मिला (वय, ४० दोघेही राहणार कोथरूड, पुणे) त्यांच्या मुलासह पुसद येथून पुण्याला चालले होते. नगर-पुणे मार्गावर चास शिवारात ते गाडीसह (फॉर्च्यून-  एम. एच १२. एफ. यू. ८४३३) थांबले होते. आरोपी तिथे आले व त्यांनी गायकवाड यांना मारहाण सुरू केली आणि त्यांच्याजवळचे दागिने हिसकावून घेतले. तसेच गाडी घेतली व पळ काढला. गायकवाड यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद केली. पोलिसांनी त्वरेने तपास करून गाडी व दागिन्यांसह आरोपींना अटक केली. तत्कालीन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे यांची भूमिका, तसेच सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. नरवडे, पंच विजय भोसले, श्रीमती शर्मिला गायकवाड यांची साक्ष महत्वाची ठरली. जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी सुनावणीअंती आरोपींना दोषी ठरवून सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:54 am

Web Title: jail for two suspect arrested in murdered case
टॅग : Jail
Next Stories
1 पारनेरमधील १०० गावांची आणेवारी पन्नासपेक्षा कमी
2 पथदिवे तपासणीला विखे कॉलेजचाही नकार
3 उपमहापौरांनी थांबवले चुकीचे बांधकाम
Just Now!
X