तालुक्यातील शिरेवाडी येथील लष्करी जवान नामदेव किसन भांगे (३८) जम्मू काश्मीर येथे कार्यरत असताना शहीद झाला.
नामदेव हा हवाईदलात होता. नामदेवची पत्नी पोलीस दलात असून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान भाऊ, दोन बहिणी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे. भांगे कुटुंबिय शेतकरी आहे. नामदेवचे प्राथमिक शिक्षण टाकेद येथे झाले. अत्यंत मनमिळाऊ व शाळेत सर्वाधिक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नामदेवने लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी चांगुणा नाशिक ग्रामीण पोलीस दलात नोकरीस असून देवळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांची मुलेही देवळा येथेच शिक्षण घेत आहेत. नामदेव मागील महिन्यात २० दिवसाच्या सुटीवर शिरेवाडी येथे येऊन गेला होता. त्यावेळी त्यांनी सर्व मित्रांची भेट घेतली होती.
आठ महिन्यानंतर नामदेव लष्करातून निवृत्त होणार होता, अशी माहिती नामदेवचा मित्र संतोष परदेशी यांनी दिली.