तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधून या उद्योगाची जपणूक करून सक्षम नेतृत्व केल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.
लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री कुंवर आनंदसिंग, तंत्रज्ञानमंत्री अभिषेक मिश्रा, होमगार्डमंत्री ब्रह्मशंकर त्रिपाठी यांनी हा पुरस्कार कोल्हे यांना प्रदान केला.  
संस्थेचे अध्यक्ष जी. एस. राव यांनी कोल्हे यांनी राष्ट्रीय सहकारी साखर संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला.
सत्कारास उत्तर देताना शंकरराव कोल्हे म्हणाले, काळय़ा आईची सेवा करणारा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच्या शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आपला आयुष्यभर संघर्ष सुरू आहे असे सांगून त्यात साथ देणा-या सहका-यांना हा पुरस्कार समर्पित केला.
फोटो ओळी-
भारत सरकार अंगीकृत शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना साखर उद्योगात केलेल्या कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. 

educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई