नवी दिल्ली येथे दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जाहीर झाला आहे. लखनौ (उत्तर प्रदेश) येथे या संस्थेचा २६ सप्टेंबरला वार्षिक समारंभ होणार असून त्या वेळी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
साखर उद्योगाच्या वाढीसाठी दिलेले योगदान व साखर उद्योगामध्ये केलेले महत्त्वपूर्ण कार्य याचा आढावा घेऊन हा पुरस्कार दिला जातो. जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून आवाडे यांनी परिसराचा कायापालट केला आहे. साखर उद्योगास भरीव योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल त्यांची राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय साखर कारखाना सहकारी महासंघाच्या अध्यक्षपदी तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट अ‍ॅन्ड केन ग्रोव्हर्स या जागतिक पातळीवरील संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.