News Flash

सिडकोतील सराफी व्यावसायिकास मारहाण

गणपती मंदिराच्या जिर्णोध्दारासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावून सराफी व्यावसायिकास मारहाण करण्याची घटना सिडकोतील गणेश चौकात घडली असून याप्रकरणी चौघांविरूध्द अंबड पोलीस टाण्यात तक्रार दाखल करण्यात आली

| July 26, 2014 01:56 am

गणपती मंदिराच्या जिर्णोध्दारासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावून सराफी व्यावसायिकास मारहाण करण्याची घटना सिडकोतील गणेश चौकात घडली असून याप्रकरणी चौघांविरूध्द अंबड पोलीस टाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गणेश चौकात चारूहास घोडके यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका मित्राच्या दुरध्वनीवरून त्यांना गणेश सोनवणे याचा संदेश आला. गणेश चौकातील गणपती मंदिराच्या जिर्णाध्दारासंदर्भात चर्चा करावयाची असल्याचे सांगून घोडके यांना बोलावून घेण्यात आले.
घोडके हे चौकात गेल्यावर सोनवणेने कुरापत काढून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्या समवेत असलेल्या नवजीत नंद्रा, योगेश बागले, अशोक सरोदे यांनीही घोडके यांना हत्यारासह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत घोडके यांच्या गळ्यातील लॉकेट, बोटातील अंगठय़ा, हातातील ब्रेसलेट गहाळ झाले. अनिल नागमोती, यमाजी कापसे, प्रदीप देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दमबाजी करण्यात आल्याने ते पळून गेले. मारहाणीचे वृत्त कळल्यानंतर आपले बंधू जगदीश आणि विष्णू पवार यांनी आपणास खासगी रूग्णालयात दाखल केल्याचे चारूहास घोडके यांनी तक्रारीत म्हटले आहे. सोनवणे, नंद्रा, बागले, सरोदे यांच्याविरूध्द कारवाई करण्याची मागणी घोडके यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:56 am

Web Title: jeweller assault in cidco ganesh chowk
Next Stories
1 इगतपुरीच्या पूर्वभागात विकास कामांचे उद्घाटन
2 डॉ. विलास साळुंके अनुवादित ‘जीएं’च्या इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन
3 ‘..तर धनगर समाज बिऱ्हाड आंदोलन करणार’
Just Now!
X