News Flash

जेएनपीटी व वाहतूक विभागाच्या हालगर्जीपणाचा आणखी एक बळी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बवरील धुतूम येथील इंडियन ऑइलच्या टँक फार्मजवळ बुधवारी धुतूममधीलच श्रीकांत ठाकूर (२६) या तरुणाला कंटेनरने धडक दिल्याने या अपघातात त्याचा

| March 15, 2014 04:13 am

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बवरील धुतूम येथील इंडियन ऑइलच्या टँक फार्मजवळ बुधवारी धुतूममधीलच श्रीकांत ठाकूर (२६) या तरुणाला कंटेनरने  धडक दिल्याने या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या धुतूम तसेच इतर गावातील ग्रामस्थांनी काही तास राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक रोखून धरीत रास्ता रोको केला.
यापूर्वी याच गावातील १२ पेक्षाही अधिकांचा मृत्यू अशाच प्रकारच्या वाहनांच्या धडकेमुळे झालेला आहेत. त्यामुळे धुतूम तसेच उरण व जेएनपीटी परिसरातील हलक्या व प्रवासी तसेच दुचाकी वाहनांनासाठी सíव्हस रोड देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उरण परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जेएनपीटी, सिडको, सार्वजनिक बांधकाम खाते या विभागाच्या माध्यमातून रस्ते निर्माण केले जात आहेत. चार पदरी रस्ते तयार करून या रस्त्यावरून अवजड तसेच प्रवासी, दुचाकी वाहनेही एकाच ठिकाणावरून प्रवास करीत आहेत.अवजड कंटनेर वाहनचालकांकडून सुरक्षेचे कोणतेही पालन केले जात नाही. या परिसरातील नव्वद टक्क्यांहून अधिक अवजड व लांबीच्या वाहनांवर क्लिनर नाहीत, धोक्याचा इशारा देणारे दिवे नाहीत अशा स्थितीत ही अवजड वाहने बेदरकारपणे चालविली जात आहेत. त्यामुळेच या परिसरातील अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच अनेक ठिकाणी असलेल्या बेकायदा गोदामात जाण्यासाठी दुभाजकांना भेदून बेकायदा अवजड वाहने जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच अवजड वाहने चालणाऱ्या रस्त्याला सíव्हस रोड देण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 4:13 am

Web Title: jnpt transport
टॅग : Transport
Next Stories
1 मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड
2 असंतुष्ट प्रकल्पग्रस्तांबरोबर सिडकोची आज पहिली बैठक
3 वाहतूक कोंडीचा गुंतवणुकीवरही परिणाम
Just Now!
X