News Flash

संजय बापट यांना पत्रकार संघाचा पुरस्कार

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कारा’साठी दै. ‘लोकसत्ता’चे खास

| December 21, 2013 12:48 pm

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कारा’साठी दै. ‘लोकसत्ता’चे खास प्रतिनिधी संजय बापट यांची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट राजकीय बातम्यांबद्दल संजय बापट यांना ‘नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’चे वार्ताहर नितीन चव्हाण यांना ‘कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार’, साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे स्तंभलेखक डॉ. जे. बी. शिंदे यांना ‘विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
तसेच ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये लिखित ‘पत्रकार दि. वि. गोखले : व्यक्तित्व व कर्तृत्व’ या पुस्तकाची ‘जयहिंद प्रकाशन पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार भवन, आझाद मैदान येथे आयोजित करम्यात येणाऱ्या समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. समारंभास प्रमुख पाहुणे व महनीय वक्ते म्हणून साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 12:48 pm

Web Title: journalist union award to sanjay bapat
Next Stories
1 मंदी दाटू लागली!
2 लोकलचे तिकीट मोबाइलवर?
3 एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय की बेवारस गोदाम?
Just Now!
X