News Flash

‘स्पीक एशिया’त फसलेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा

मीरा रोडमध्ये स्पीक एशिया कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, फसवणूक झालेल्या इतरांनी तक्रार दाखल करण्यासाठी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा,

| April 3, 2013 01:32 am

मीरा रोडमध्ये स्पीक एशिया कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, फसवणूक झालेल्या इतरांनी तक्रार दाखल करण्यासाठी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मीरा रोडच्या नयानगरमध्येदेखील जस्सीम ऊर्फ जसीमुद्दीन शेख (४१) याने मास डिस्ट्रिब्युटर्स नावाने ‘स्पीक एशिया’त गुंतवणुकीसाठी लोकांकडून मोठय़ा रकमा घेणे सुरू  केले होते. विनायक सानप यांच्या तक्रारीवरून मीरा रोड पोलिसांनी तारक विमलेंदु बाजपेयी (३६), रवी जनकराद खन्ना (४४), राजीव मनमोहन मेहरोत्रा (५५) व दीपंकर दुलालचंद सरकार (३८) यांना अटक केली होती; परंतु जसीमुद्दीनसह कंपनीचे चेअरमन हरेन कौर, पदाधिकारी मनोजकुमार मात्र अद्याप फरार आहेत. फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी फसवणुकीचे स्वरूप, रक्कम, आरोपी दलाल यांची माहिती देण्याचे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक ललित वर्टिकर यांनी केले आहे. त्यासाठी भाईंदर पोलीस ठाण्यामागे असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावयाचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:32 am

Web Title: just contact to police who are struct in speak asia
Next Stories
1 मराठी चित्रपटांसाठी ‘आजचा दिवस माझा’
2 हाडे ठिसूळ करणारी कृत्रिम शीतपेये नकोत !
3 मीरा-भाईंदर मनपाच्या स्थायी समितीच्या अभ्यासदौऱ्याला लाल सिग्नल
Just Now!
X