18 September 2020

News Flash

‘सह्यद्री’ सिने पुरस्कारांत ‘काकस्पर्श’सवरेत्कृष्ट

चार पुरस्कार मिळवून ‘अजिंठा’ चित्रपटाची आघाडी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री सिने’ पुरस्कारांमध्ये ‘काकस्पर्श’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला तर वेगवेगळ्या गटात ‘अिजठा’ चित्रपटाने चार पुरस्कार मिळवून बाजी मारली. प्रभादेवी

| June 20, 2013 08:09 am

चार पुरस्कार मिळवून ‘अजिंठा’ चित्रपटाची आघाडी
दूरदर्शनच्या ‘सह्याद्री सिने’ पुरस्कारांमध्ये ‘काकस्पर्श’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला तर वेगवेगळ्या गटात ‘अिजठा’ चित्रपटाने चार पुरस्कार मिळवून बाजी मारली. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात मंगळवारी पुरस्कार वितरण सोहोळा दिमाखात साजरा झाला.
‘सवरेत्कृष्ट चित्रपट’ या गटात काकस्पर्श, धग, अजिंठा या चित्रपटांमध्ये स्पर्धा होती. ‘अजिंठा’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट गीतकार (ना.धों महानोर), सवरेत्कृष्ट संगीत (कौशल इनामदार), सवरेत्कृष्ट पाश्र्वगायिका (हंसिका अय्यर) व सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन (नितिन चंद्रकांत देसाई) असे चार पुरस्कार मिळाले.
चौथ्या सह्याद्री सिने पुरस्काराचे अन्य मानकरी पुढीलप्रमाणे. गट, चित्रपट आणि कंसात पुरस्कार विजेता या क्रमाने सवरेत्कृष्ट कथा- मोकळा श्वास (अनुराधा वैद्य), सवरेत्कृष्ट पटकथा- श्यामचे वडील (अजय पाठक व आर. विराज), सवरेत्कृष्ट संवाद- भारतीय म्हंजी काय रे भाऊ (संजय पवार), सवरेत्कृष्ट पाश्र्वगायक- तुकाराम (ज्ञानेश्वर मेश्राम), सवरेत्कृष्ट पाश्र्वसंगीत-शूर आम्ही सरदार (महेश नाईक), सवरेत्कृष्ट छायाचित्रण- पुणे ५२ (जेरेमी रिगम), सवरेत्कृष्ट संकलन- सत्य, सावित्री आणि सत्यवान (सर्वेश परब), सवरेत्कृष्ट ध्वनी-भारतीय म्हंजे काय रे भाऊ (मनोज मोचेमाडकर), सवरेत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक- आयना का बायना (उमेश जाधव), सवरेत्कृष्ट पदार्पण- मोकळा श्वास (मृण्मयी देशपांडे), सवरेत्कृष्ट बालकलाकार- धग (हंसराज जगताप), सवरेत्कृष्ट अभिनेत्री-धग (उषा जाधव), सवरेत्कृष्ट अभिनेता-विभागून १) अनुमती (विक्रम गोखले) २) काकस्पर्श (सचिन खेडेकर), सवरेत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट- बालक पालक) आणि सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- धग (शिवाजी लोटण पाटील)    
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, एन. चंद्रा, अभिनेते सचिन, महेश कोठारे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी प्रास्ताविक केले. या सोहोळ्यात यंदाच्या पुरस्कार निवड समितीमधील सदस्य किरण शांताराम, एन. चंद्रा, समृद्धी पोरे, दिलीप ठाकूर, कुमार सोहोनी, मीनल जोगळेकर यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी केले.
हे पुरस्कार गोदरेज एक्सपर्ट केअर यांनी प्रायोजित केले होते. या समारंभास ‘गोदरेज’चे सॅम बलसारा, नीरज बाज, पंकज, इटालियन दुतावासाचे पिंटो, ‘गोदरेज’चे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वसंत प्रभू, वसंत पवार आणि वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या गाण्यांवरील नृत्य, गायक अजित पवार यांनी संगीतबद्ध केलेली व स्वत: त्यांनीच सादर केलेली काही गाणी, गायिका उर्मिला धनगर यांनी सादर केलली गाणी आणि संगीतकार सी. रामचंद्र यांच्या काही गाजलेल्या गाण्यांवर आधारित नृत्य या सोहोळ्यात सादर करण्यात      आली.
या संपूर्ण सोहोळ्याचा दूरदर्शन वृत्तान्त येत्या ३० जून रोजी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून दुपारी चार वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

‘ती’ गायली आणि ‘त्या’ने जिंकले..!
प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिराच्या सभागृहात लताबाईंच्या ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ या गाण्याचे आर्त स्वर घुमले. उपस्थित रसिक त्या गाण्यातील वेदनेशी समरस झाले आणि एका क्षणी ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’च्या स्वरामागील तो आवाज गायिकेचा नसून एका गायकाचा आहे हे समोर आले तेव्हा सारे सभागृह अक्षरश: अवाक् झाले. ही किमया करून दाखविली साईराज अय्यर या तरुण गायकाने..
निमित्त होते दूरदर्शनच्या सह्याद्री सिने पुरस्कार वितरण सोहोळ्याचे. मंगळवारी साजऱ्या झालेल्या या संपूर्ण कार्यक्रमावर साईराज आपल्या या अनोख्या गायनशैलीचा ठसा उमटवून गेला. साईराज एकाचवेळी पुरुष आणि स्त्रीच्या आवाजात तितक्याच ताकदीने व सुरात गातात, हे त्यांचे वैशिष्टय़. साईराज यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. ते प्रेक्षकांमध्येच मागच्या रांगेत बसले होते. हातात माईक धरून ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ म्हणत ते व्यासपीठावर गेले आणि हे गाणे म्हणणारा स्वर पुरुषाचा आहे, हे कळल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.  या गाण्यानंतर त्यांनी हेमंतकुमार व लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा’ हे गाणे अगदी जसेच्या तसे सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2013 8:09 am

Web Title: kaksparsh get the award in sahydri cine awards
Next Stories
1 जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी आवाहन
2 हाऊसिंग फेडरेशन निवडणुकीत प्रदीप सामंत पॅनेलचा विजय
3 ‘अल्ताफ’ दुर्घटना : माजी मालकांची अटकपूर्व जामिनासाठी धाव
Just Now!
X