24 September 2020

News Flash

कामोठे रहिवाशांना फोरमचे कवच

कामोठे नोडमध्ये प्रवाशांच्या हक्कासाठी वेळीच धावून आलेल्या सिटिझन युनिटी फोरमने (कफ) रविवारी येथील रहिवाशांना एकत्र करून कामोठे

| March 3, 2015 06:36 am

कामोठे नोडमध्ये प्रवाशांच्या हक्कासाठी वेळीच धावून आलेल्या सिटिझन युनिटी फोरमने (कफ) रविवारी येथील रहिवाशांना एकत्र करून कामोठे सिटिझन फोरमची स्थापना केली आहे. यामुळे कामोठेवासीयांना त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी यापुढे फोरमचे कवच मिळाले आहे. वसाहतीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यतिरिक्त अन्य पायाभूत समस्यांसाठी हे फोरम  प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कफचे अरुण भिसे यांनी दिली.
कामोठेच्या प्रवाशांचा आवाज होऊन कफने येथील बससेवा सुरू राहावी यासाठी मोलाचे योगदान दिले. मात्र कामोठे येथील बसच्या भवितव्यासोबत इतर समस्या अजूनही आ वासून आहेत. तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे चालाव्यात, बससेवेचे नवीन मार्ग सुरू करावे, ग्राहकांची होणारी लूटमार थांबविण्यासाठी योजना, एकही उद्यान नसलेल्या या नोडमध्ये उद्याने विकसित करण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणे, शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण रोखण्यासाठी, वाढत्या सोनसाखळी चोरांचा उच्छाद पोलिसांच्या सहकार्याने थांबविण्यासाठी तसेच इतर वसाहतींच्या तुलनेत येथे दुधावर प्रति लिटर दोन रुपयांचा जादा स्थानिक कर प्रत्येक कामोठेवासीयांना भरावा लागतो यासाठी हे फोरम काम करणार आहे.
कामोठे येथील स्थानिक करांच्या जाचामध्ये मंत्रालयात काम करणारे ते बडे पोलीस अधिकारीही सुटलेले नाहीत. पनवेलच्या कफ संघटनेने आपला विस्तार पनवेलमधून कामोठे व खांदा कॉलनीमध्ये केल्याने इतर वसाहतींमधील दबलेल्या आवाजाला वाव मिळाला आहे. खांदेश्वर वसाहतीमध्ये बससेवा सुरू व्हावी यासाठी कफचे सदस्य आजही प्राधान्याने काम करत आहेत.
कामोठे फोरममध्ये एस. डी. कोटियन, जी. आर. मंचेकर, सी. डी. शिंदे, सुजीत पुजारी, मंगेश बोबडे, गजानन शिंदे, वैशाली घोसाळकर, मीनाक्षी कोटियन, गौरव पोरवाल, उमेश खेडेकर, प्रवीण जाधव, कोंडिबा कांबळे, बेबीराज कोटियन, सुनील पाद्धे या होतकरू सदस्यांची नोंदणी झाली आहे. इतर रहिवाशांनी या फोरममध्ये सामील होण्याचे आवाहन फोरमने केले आहे. अधिक माहितीसाठी ८६८९८६४३६६, ९२२४३२७०६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:36 am

Web Title: kamothe panvel
टॅग Kamothe,Panvel
Next Stories
1 महाकाय लाटांमुळे नागावचा पिरवाडी किनारा उद्ध्वस्त
2 निवडणुकीच्या तोंडावर बोगस नागरी कामांचा सुळसुळाट
3 पनवेलकरांची पाणीपट्टी वाढणार
Just Now!
X