शॉवलिन किंग ऑफ कुंग-फू मार्शल आर्टस् स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत औरंगाबादच्या किडस् प्राइड इंग्लिश स्कूलच्या संघाने जेतेपद पटकावले. मुंबईच्या तायक्वांदो अॅण्ड कराटे स्पोर्टस् असोसिएशनला उपविजेतेपद, तर चाळीसगावच्या थांगदा मार्शल असोसिएशनने तिसरा क्रमांक मिळविला.
नगरसेविका छाया वेताळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एस. ए. खलील होते. स्पर्धेत ३२२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. कथास व मुव्हमेंटस् प्रकारात औरंगाबाद, मुंबई व चाळीसगावच्या संघांनी पहिली तीन बक्षिसे मिळविली. फाईट प्रकारात शॉवलिन किंग ऑफ कुंग-फू संघ, नाशिकच्या शुटुरिओ कराटे डू असोसिएशन, तसेच औरंगाबाद स्पोर्टस् असोसिएशनने बाजी मारली. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मानकरी अदित्या कुणगर, तर उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल किडस् प्राइड इंग्लिश स्कूलच्या संघाला गौरविण्यात आले.
मुव्हमेंटस् कथास प्रकारामध्ये अथर्व साळवे, अथर्व सोनवणे, आदित्य खरात, पार्थ बुट्टे, पवन टाले, मनीष गायकवाड, कुणाल कदम यांनी सुवर्णपदक पटकावले. रौप्यपदक – निधी कोडम, गौरी मनवदकर, शिविका चव्हाण, भक्ती राठोड, मानसी चौधरी, कास्य पदक – साक्षी गायकवाड, रोहन वेताळ, यश तोतला, देवयानी राऊत, दिशा खरात, तनिष्का कानगावकर, पौर्णिमा वानखेडे या खेळाडूंनी पटकाविले. स्पर्धेचे आयोजक मिलिंद घोरपडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. साधना पवार, शिवनारायण बजाज, सुदाम मालुंजकर, मंजुश्री चपळगावकर, जितेंद्र जोशी, भास्कर टाले आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.