News Flash

शहादा नगराध्यक्षपदी करुणाताई पाटील

शहादा नगराध्यक्षपदी करुणाताई पाटील यांची अविरोध निवड झाली. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार, नायब तहसीलदार उल्हास देवरे व नगरसेवक उपस्थित होते.

| April 26, 2013 02:47 am

शहादा नगराध्यक्षपदी करुणाताई पाटील यांची अविरोध निवड झाली. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार, नायब तहसीलदार उल्हास देवरे व नगरसेवक उपस्थित होते.
सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या धोरणाप्रमाणे सव्वा वर्षांनंतर नगराध्यक्षा संगीता पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी करुणा पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. खरे तर माजी नगराध्यक्ष काशिनाथ सजन पाटील यांची पत्नी नगरसेविका कांताबाई यांचेही नाव चर्चेत होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्या नावाचा सत्ताधारी गटाने विचार केला नाही. निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवारी दुपारी पीठासीन अधिकारी अनिल भंडारी यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदी करुणाताई पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले.नगरपालिकेत स्वीकृत सदस्यांसह २६ नगरसेवक असूनही बैठक व्यवस्था अपूर्ण होती. याचा विरोधी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. दत्ता वाघ, विनोद चौधरी, सुनंदा चौधरी यांनी  मुख्याधिकारी व पीठासीन अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. या संदर्भात विरोधी नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:47 am

Web Title: karunatai patil elected for shahada nager president
Next Stories
1 धरणांमधील गाळ काढण्याची मागणी
2 मनमाडमधील रस्ते सुंदर करणार- आ. पंकज भुजबळ
3 महात्मा गांधी विद्यामंदिरतर्फे व्यंकटराव हिरे यांना अभिवादन
Just Now!
X