09 March 2021

News Flash

यूपीएससीत दोघा लातूरकरांची भरारी

मराठवाडय़ातील लोकांना मागास म्हणून संबोधले जाते. मात्र, या मागास भागातील लोकच अधिक जागरूक असतात. याचाच लाभ यूपीएससी परीक्षेत आपल्याला झाला, अशी प्रतिक्रिया या परीक्षेत महाराष्ट्रात

| May 4, 2013 12:06 pm

मराठवाडय़ातील लोकांना मागास म्हणून संबोधले जाते. मात्र, या मागास भागातील लोकच अधिक जागरूक असतात. याचाच लाभ यूपीएससी परीक्षेत आपल्याला झाला, अशी प्रतिक्रिया या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावलेल्या कौस्तुभ देगावकर याने व्यक्त केली.
लातूरच्या केशवराज विद्यालयात शालेय शिक्षण झालेल्या देगावकरने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए मराठी, तर नांदेड विद्यापीठातून एमए मराठीची परीक्षा दिली. यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने अभ्यास केला व घवघवीत यश संपादन केले. लातूर येथील युनिक अ‍ॅकॅडमीचे प्रवीण चव्हाण यांचे आपल्याला चांगले मार्गदर्शन लाभल्याचे देगावकर यांने सांगितले.
लातूरचीच शिल्पा आग्रे महाराष्ट्रात दुसरी आली. यूपीएससी परीक्षेसाठी क्लासवर अवलंबून न राहता स्वत: मेहनत केली. आई, वडिलांनी पाठबळ दिले. त्यामुळे आपल्याला चांगले यश मिळाल्याचे शिल्पाने सांगितले. लातूरची मुले प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे शिल्पाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2013 12:06 pm

Web Title: kaustubh degaonkar of latur top upsc exam
टॅग : Upsc Exam
Next Stories
1 पालकमंत्र्यांनी धारेवर धरताच ‘बीडीओ’ बैठकीमधून गायब!
2 पत्रकारास मारहाण; सोनपेठला ‘बंद’ने निषेध
3 लातूर धान्य महोत्सवात दीड कोटीची उलाढाल
Just Now!
X