स्वातंत्र्यानंतर पन्नास वष्रे औद्योगिकदृष्टय़ा प्रगत होत असलेल्या उरण तालुक्यातील पूर्व विभाग कोणतेही दळणवळणाचे साधन नसल्याने विकासापासून वंचितच राहीला होता.तालुक्याच्या पुर्व व पश्चिम विभागाला जोडण्यासाठी खोपटा खाडी पुलावर ऐंशीच्या दशकात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी खोपटा पुलाला मंजूरी दिली होती.  हा पुल तयार होऊन रहदारीसाठी खुला होण्याकरीता तब्बल पंधरा वर्षांचा कालावधी लागला होता. आता या खाडीवर उभारल्या जात असलेल्या नवीन खोपटा पुलाचे बांधकाम रखडलेले असून चार वर्षांपासून काम सुरू संथ गतीने सुरु आहे. यामुळे पुलाच्या बांधकामाच्या खर्चात वाढ झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जून्या खोपटा पूलावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने पुलावर खड्डे पडणे वाहनांची कोंडी होऊ लागली होती. त्यामुळे खोपटा खाडीवर नवी पुलाचे २००९ पासून काम सुरू झालेले आहे. २०११ पर्यंत पूर्ण होणार होते. मात्र निधी अभावी बांधकाम रखडत गेले. सुरुवातीला १० कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या बांधकामाचा खर्च आता १४ कोटींच्या घरात गेला आहे. एप्रिल २०१४ प्रयत्न काम पुर्ण करण्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. मात्र अद्याप ही काम संथ गतीने सुरु असल्याने प्रशासनाच्या या दाव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.  
नवीन पुलामुळे विकासाची संधी
उरण तालुक्याच्या पूर्व व पश्चिम विभागाला छेदणारी खाडी असल्याने जीव मूठीत घेऊन दररोज छोटय़ा (डवलुक्यात) होडीने गुडग्या पर्यंतच्या चिखलातून उतरून आपल्या नोकरी,व्यवसाय व शिक्षणासाठी ये-जा करणारी येथील मंडळी शेती असली तरी समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे बाहेरकाठे उध्वस्त होऊन शेतीच्या नापिक होण्याचे संकट कोसळेल याचा नेम नव्हता. खाऱ्या पाण्याखाली जमीन गेली की, पुढील पाच वष्रे शेतीच्या उत्पन्नाला मुकने निश्चित त्यामुळे शेती उत्पदनाचीही अनिश्चितता अशा स्थितीत जगणाऱ्या जनतेला खोपटा पुलाच्या निर्मितीने दिलासा दिला आहे. १५ वर्षांपूर्वी खोपटा पूलाची उभारणी झाली आणि परिसरातील नागरीकांचे जीवनमानच बदलले जेएनपीटी बंदरावर आधारीत व्यवसांमुळे निर्माण झालेल्या गोदामांमुळे दररोज जीवमुठीत घेऊन नोकरीसाठी होणारी पायपीट काही प्रमाणात थांबली नव्या तरूणाईला रोजगाराची संधी दिसू लागल्या. नव्या खोपटा पुलाची पुर्तता ही खोपटा विभागासह तालुक्यातील वीस गावे व पनवेल व पेण तालुक्यातील गावांना विकासाची अधिक संधी उपलब्ध होणार असल्याने या पुलाच्या पुर्णूत्त्वाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.