28 September 2020

News Flash

पारनेर तालुक्यातील किन्हीचा तलाठी लाचेच्या सापळ्यात

किन्ही (ता. पारनेर) येथील कामगार तलाठी राजाराम बबन भांड यास आज ६ हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

| June 15, 2013 01:38 am

किन्ही (ता. पारनेर) येथील कामगार तलाठी राजाराम बबन भांड यास आज ६ हजार रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. यासंदर्भात अनिल भाऊसाहेब तांबडे (रा. तिखोल, पारनेर) यांनी विभागाकडे तक्रार केली होती.
तांबडे यांच्या तिखोल येथील गट क्र. १९४, १९९, ५२३ व १४५ चे न्यायालयाच्या आदेशानुसार खातेफोड करून, त्यांचा भाऊ व आई यांची नावे महसूल रजिस्टरला लावून, सुधारित सात-बारा उतारा मिळण्याची मागणी केली होती. परंतु कामगार तलाठी भांड याने त्यासाठी तांबडे यांच्याकडे ६ हजार रु. लाचेची मागणी केली. तांबडे यांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक राजेंद्र माळी, हवालदार राजेंद्र खोंडे, प्रमोद जरे, रवींद्र पांडे, श्रीपादसिंह ठाकूर, दशरथ साळवे यांच्या पथकाने तलाठी कार्यालयातच आज दुपारी सव्वा वाजता तांबडे यांच्याकडून लाच घेताना भांडला पकडले. भांडविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:38 am

Web Title: kinhi talathi caught taking bribe
टॅग Bribe,Talathi
Next Stories
1 साडेतीनशे मुले शिक्षणापासून वंचित राहणार?
2 पालिकेच्या मुख्याधिका-यांना घेराव
3 अभियांत्रिकी शिक्षणात रोज नवीन दालने – शरद पवार
Just Now!
X