21 September 2020

News Flash

मोनिका मोरेच्या मदतीसाठी नेहरूनगरमध्ये रविवारी पतंगोत्सव

घाटकोपर येथे उपनगरीय गाडी पकडताना अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या मदतीसाठी कुल्र्यातील संपूर्ण नेहरूनगर एकवटले आहे.

| January 24, 2014 06:15 am

घाटकोपर येथे उपनगरीय गाडी पकडताना अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या मदतीसाठी कुल्र्यातील संपूर्ण नेहरूनगर एकवटले आहे. रविवार, २६ जानेवारी रोजी नेहरूनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पतंग उडवा आणि मोनिकाला मदत करा’ असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विहंग प्रतिष्ठान आणि आदर्श कला, क्रीडा सेवा मंडळ या संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला असून नेहरूनगरमधील सर्व सेवाभावी संस्था उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.
मोनिका मोरे नेहरूनगरमध्ये राहते. तिच्या मदतीसाठी विविध संघटनांनी मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे. मोनिकाच्या उपचारांचा खर्च ५० लाख रुपये आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांनी तिला मदतीचा हात दिला आहे. मोनिकाला मदत करण्यासाठी नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आयसीआयसीआय बँकेमध्ये तिच्या वडिलांचे खाते असून दि शामराव विठ्ठल सहकारी बँकेच्या नेहरूनगर शाखेतही मोनिका आणि तिच्या वडिलांचे संयुक्त खाते उघडण्यात आले आहे. विहंग प्रतिष्ठान आणि आदर्श कला, क्रीडा सेवा मंडळाने ‘पतंग उडवा आणि मोनिकाला मदत करा’ हा उपक्रम जाहीर केला असून रविवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पतंग उडविण्यात येणार आहेत. या उपक्रमात एकचवेळी ३०० पतंग उडविण्याचा विक्रम करणारे जगन्नाथ पाटील सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सहभागी होऊन यंदाचा प्रजासत्ताकदिन आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करून सारे भारतीय एक आहेत आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही संकल्पना साकार करूया, असे आवाहन विहंग प्रतिष्ठानने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 6:15 am

Web Title: kite fest at nehru nagar for help to monika more
टॅग Mumbai News
Next Stories
1 वास्तवदर्शी लिखाणाला व्यासपीठ मिळवून देणारा ‘नॉन फिक्शन फेस्ट’
2 आजपासून श्रीसंकल्प प्रतिष्ठानचा वरळी सांस्कृतिक महोत्सव
3 खास क्षण क्लिप्समध्ये बंदीस्त करणे टाळा
Just Now!
X