वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर कादंबरी कवाळे या सभेसमोर, उपमहापौर फराकटे हे महापौरांकडे राजीनामा देणार आहेत. महापौरपद काँग्रेसकडे जाणार असून त्यासाठी कांचन कवाळे व जयश्री सोनवणे या इच्छुक आहेत; परंतु जयश्री सोनवणे यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सचिन खेडकर यांच्यासह आणखी काही जण इच्छुक असल्याचे समजते.महापौर कादंबरी कवाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून आघाडीत ठरलेल्या फॉम्र्युल्यानुसार दोन्ही पक्षांच्या सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यमान महापौर व उपमहापौर यांना दिलेला एक वर्षांचा कार्यकाल संपला असून त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा द्यावा, असे आदेश नेत्यांनी यापूर्वीच दिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे तहकूब झालेली सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. २७) बोलविण्यात आली आहे.