04 July 2020

News Flash

कोयना धरणाचे २ फुटांवर उघडलेले दरवाजे ‘जैसे थे’

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे काल सकाळी साडेदहा वाजलेपासून २ फुटाने उचलून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग कायम आहे. धरणात सुमारे २० हजार क्युसेक पाण्याची

| August 14, 2013 01:50 am

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे काल सकाळी साडेदहा वाजलेपासून २ फुटाने उचलून कोयना नदीपात्रात करण्यात येणारा विसर्ग कायम आहे. धरणात सुमारे २० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असताना दरवाजांसह पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात १६,७०९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धरण व्यवस्थापनाकडून पाणीसाठा नियंत्रित राखत पुराचा संभाव्य धोका  टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, धरणक्षेत्रासह त्याखालील कराड व पाटण तालुक्यात श्रावणातील ऊन – पावसाचा खेळ सुरूच आहे.  
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २२ एकूण ४,६८६, महाबळेश्वर विभागात ३३ एकूण ५,०३८ , प्रतापगड ६० एकूण ४, २६८ तर, नवजा विभागात ५४ एकूण सर्वाधिक ५,५२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात धरणक्षेत्रात सरासरी २५ मि. मी. पावसाची नोंद आहे. कोयना जलाशयाची पाणीपातळी २,१५८ फुट ६ इंच तर, पाणीसाठा ९८.७८ टीएमसी म्हणजेच ९३.८५ टक्के आहे. चालू हंगामातील ६६ दिवसात दररोज सरासरी २ टीएमसीपेक्षा जादा पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात १३३ टीएमसी पाण्याची आवक होताना  सुमारे ५६ टीएमसी पाणी दरवाजातून सोडण्यात आले. हे पाणी वापराविना वाया गेले आहे. तर, सुमारे ११ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी कारणी लागले आहे. कोयना धरणातून हा एकंदर विसर्ग सुमारे ६७ टीएमसी झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2013 1:50 am

Web Title: koyna dam door on two foot open door as it is
टॅग Dam,Door,Karad,Koyna,Leave
Next Stories
1 मनसे कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश
2 उजनीतील पाणी नियोजनाची मागणी; सत्ताधाऱ्यांना अधिकार नाही
3 तोडफोडीच्या निषेधार्थ कोल्हापूर महसूल कर्मचाऱ्यांचे ‘लेखणी बंद’
Just Now!
X