देशातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी पारंपरिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी ‘कृषी वसंत’ प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक औजारांचा स्वतंत्र विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत असून या विभागाला शेतकरी मोठय़ा संख्येने भेट देत आहेत.  गुरुवार हा प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.  
वर्धा मार्गावरील कापूस संशोधन संस्थेच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनात सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर येथे लावण्यात आलेली स्वयंचलित ठिबक यंत्रणा शेतकऱ्यांच्या वेळेत व ऊर्जेत बचत करण्यासाठी उपयुक्त आहे. या स्टॉललाही शेतकरी मोठय़ा संख्येने भेट देत आहेत. ग्रीन हाऊसचे नावीन्यपूर्ण व नवीन तंत्रज्ञानाचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. तसेच शेड नेट व मिल्चग फिल्म  सारखे आधुनिक प्रयोगांची प्रात्यक्षिकांची मांडणीही येथे करण्यात आली आहे. या विभागात लावण्यात आलेला िपजऱ्यामधील मत्स्य पालनाचा स्टॉल सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.  
याच विभागातील अत्याधुनिक शेती औजारांचा स्टॉलही आकर्षक आहे. यामध्ये रोटर मारून एकाच वेळी बियाण्यांची पेरणी करणारा रोटो सीड ड्रीलर, कठीण जमिनीची मशागत करणारा पावर हेरो, कंम्पोस्ट खत पसरविणारा कंम्पोस्ट स्प्रेडर, उंच झाडांची निगा राखण्यासाठी ८ मीटर उंचीपर्यंत नेणारा स्वयंचलित प्लॅटफॉर्म, लहान तथा तुकडय़ांच्या शेतीसाठी उपयुक्त छोटा रोटावेटर, सामान्य आकारमानाचा रोटावेटर, २५ मिली मीटर उंचीच्या गवताची कापणी करणारा रोटर स्लेशर, १२ ते १४ मीटपर्यंत धान्यांची तसेच खताची समप्रमाणात फेक करणारा फर्टलिाइजर ब्रोडकास्टर, शेतातील धान्याची कुटार, टाकाऊ काडी कचऱ्याला एकत्र गोळा करून त्याची गोल गठडी करणारा राऊन्ड बेलर, तीन फुटांपर्यंत १ ते ३६ इंचांपर्यंत गोल खड्डे तयार करणारे पोस्ट होल डिगर, शेतातील काडी-कचऱ्याला पसरविणारा मोबाईल श्रेडर, शेतात पडलेला धान्याचा भुसा, ऊसांची पाचट, गवताची कापणी करून तुकडे करणारे रोटरी मल्चर अशा अत्याधुनिक औजारांचा समावेश आहे.  
याच विभागात मांडण्यात आलेल्या विविध १५ पिकांची मळणी करणारे बहुपीक मळणी यंत्रही विशेष आकर्षक आहे. या यंत्राच्या माध्यमातून ताशी एक एकरापर्यंत मळणी सहज करता येते. या विभागात पुण्यातील मॉडर्न टेक्निकल सेंटरचा स्टॉलही विशेष आकर्षक आहे. यामध्ये पशु आणि सायकलपासून चालणारी यंत्रे ठेवण्यात आली आहेत. कमी खर्चात तयार झालेल्या या यंत्रामुळे वेळ व पशाची मोठी बचत होऊ शकते. यामध्ये सायकल व मोटरसायकलच्या माध्यमातून चालणारा पाण्याचा पंप, पिठाची चक्की, औषध फवारणी यंत्र, सायकलवरचा बॅटरी चार्जर, झोका सिंचन पंप, जलधारा पंप, मॉडर्न सिंगल पिस्टन स्प्रे पंप, आधुनिक उर्जा बलगाडी, सायकल पीठ मसाला गिरणीचा समावेश आहे.  
याच विभागातील सौर उर्जेवर चालणारे कुंपनही विशेष आकर्षक आहे. या कुंपनामुळे शेतकऱ्यांना विजेशिवाय पशु-पक्ष्यांपासून शेतातील पिकांचे रक्षण करता येणार आहे. अत्यंत कमी खर्चात तयार होणारे हे संशोधन शेतकऱ्यांच्या विशेष उपयोगाचे आहे. तसेच शेडनेट व ग्रीन हाऊसमध्ये लावण्यात येणारे कीटक प्रतिरोधक जाळीही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी महामंडळानेही नावीन्यपूर्ण औजारांचा स्टॉल मांडला आहे. या स्टॉललाही शेतकरी मोठय़ा संख्येने भेट देत आहेत. या विभागामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होत आहे.