डोंगरीपाडा येथे जागेवरून झालेल्या वादात शेजाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यातून आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेली तरुणी जखमी झाली. तिला शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. जागेच्या वादातून सरदार कर्तार सिंग, चंदकेश शर्मा व सतीश तिवारी यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजता शेजारी राहणाऱ्या गिरीधारीलाल चमार यांना मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेली मुलगी मीना चमार (२२) आणि मुलगा (अनिल) हेही जखमी झाले. मीना चमारला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2013 12:24 pm