सोलापूरच्या जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयातर्फे भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूमापन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी भूमी अभिलेख कार्यालयातील गुणवंत कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले, तसेच कर्मचाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजिलेल्या या कार्यक्रमास महापौर अलका राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तसेच जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेडे यांनी मार्गदर्शन केले. भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक बाळासाहेब वानखेडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  यानिमित्ताने भरविण्यात आलेल्या भूमी मापनविषयक प्राचीन व अत्याधुनिक साहित्यांचे प्रदर्शनास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक लीना ओहोळ (मोहोळ)यांनी सूत्रसंचालन केले. तर उपअधीक्षक सुवर्णा मसणे (मंगळवेढा) यांनी आभार मानले. उपअधीक्षक चंद्रशेखर पाटील (दक्षिण सोलापूर), इंद्रसेन लांडे (उत्तर सोलापूर), अविनाश जाधव (करमाळा), नगर भूमापन अधिकारी विजय गायकवाड आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रसेन लांडे, अतुल क्षीरसागर, सतीश गायकवाड, वाय. सी. कांबळे, पी. सी. कांबळे, सचिन डोंबाळे, महेश होमकर, विनोद उबाळे, भालचंद्र कांबळे, ए. ए. कुरेशी यांनी परिश्रम घेतले.