12 December 2019

News Flash

एमआयडीसीत भूमाफियांची दादागिरी सुरूच

डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा येथील काही अनधिकृत बांधकामे एमआयडीसीने मंगळवारी जमीनदोस्त केली.

| August 8, 2013 01:04 am

डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा येथील काही अनधिकृत बांधकामे एमआयडीसीने मंगळवारी जमीनदोस्त केली. या बांधकामांच्या ठिकाणी एमआयडीसी व एका संस्थेने संरक्षित भिंत घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी ३० ते ४० ग्रामस्थांनी येऊन सुरू असलेले बांधकाम थांबविले. पोलिसांनी या ग्रामस्थांना समज दिल्यानंतर ग्रामस्थ निघून गेले. सोनारपाडा हद्दीत डोंबिवली नागरी सहकारी बँकेजवळ असलेला एक भूखंड काही भूमाफिया हडप करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या भूखंडावर भूमाफिया बांधकामे करीत आहेत. ती बांधकामे एमआयडीसीकडून तोडण्यात येत आहेत. मंगळवारी ही बांधकामे तोडण्यात आली. बुधवारी सकाळी एमआयडीसीने हा भूखंड संरक्षित ठेवण्यासाठी भिंत उभारण्याचे काम सुरू केले होते. ग्रामस्थांनी दादागिरी करून ते बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यात आले, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

First Published on August 8, 2013 1:04 am

Web Title: landmafia vandalising continue in dombivali
टॅग Dombivali
Just Now!
X