२४ जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ अंतिम टप्प्यात पोहचला असून शुक्रवार १४ फेब्रुवारी हा या फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस आहे. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण शहरातील ७५ हून अधिक गृहोपयोगी वस्तूंच्या शो रूम्समध्ये गेल्या २० दिवसांपासून ग्राहकांच्या उत्साही प्रतिसादात हा खरेदीचा उत्सव सुरू असून महोत्सव काळात ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक नोंदविला गेला आहे. आकर्षक बक्षिसे, आठवडय़ातून एकदा सेलिब्रेटींच्या हस्ते सन्मान हे सगळे ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने ग्राहकांना अनुभवता आले. या महोत्सवामध्ये अखेरच्या दिवशीही बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. पारितोषिकांवरील कर मात्र विजेत्यांना द्यावा लागणार आहे.  फेस्टिव्हलच्या विजेत्यांना वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी तसेच पॅपिलॉन, टायटन, रेमंड, कलामंदिर यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि ‘वीणा वल्र्ड’कडून गिफ्ट हॅम्पर दिले जात आहे. आठवडय़ाच्या भाग्यवंत विजेत्याला टी.व्ही., फ्रीज आणि ‘द ब्लू रूफ’ क्लबचे एक वर्षांचे सभासदत्व अशी पारितोषिके दिली जात आहेत. त्याचप्रमाणे महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे एका भाग्यवान ग्राहकास कार व एका विजेत्याला वीणा वर्ल्डकडून दोन व्यक्तींसाठी सिंगापूरची सहल अशी बंपर पारितोषिके दिली जाणार आहेत. वीकएण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून संघवी बिल्डर्स उपप्रयोजक आहेत. त्याचप्रमाणे वामन हरी पेठे सन्स, पीतांबरी प्रॉडक्ट्स आणि तन्वी हर्बल्स हे प्लॅटिनम प्रायोजक आहेत. पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य वीणा वर्ल्ड ट्रॅव्हलर्स पार्टनर आहे. टीप-टॉप प्लाझा, गुडवीन ज्वेलर्स, चाम्र्स ग्रुप, हस्तकला सहयोगी पार्टनर आहेत. जे. के. एन्टरप्रायजेस, पॅपिलॉन डिजिटल, कलानिधी, टायटन, रेमंड आणि ऑरबिट यांनी पारितोषिके प्रायोजित केली आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल हेल्थ पार्टनर तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘द ब्लू रूफ क्लब’ आहे.
भाग्यवान विजेते (७ ते ११ फेब्रुवारी)
सुनील गायकवाड (कळवा), अरविंद राव (डोंबिवली), विलास पाटील (डोंबिवली), नामदेव सावंत (ठाणे), जयश्री कलकेरी (ठाणे) कांचन पाटील (कल्याण), स्वप्नील खोत (डोंबिवली), सरस्वती चक्रनारायण (कल्याण), दिप्ती दामले (कल्याण), मुकुंद तांबे (कल्याण) विलास पाटील (कल्याण), आरती पेठे (ठाणे), रसिका महाडिक (ठाणे), सतिश मखे (ठाणे), अनिल साळवी (कल्याण), कावेरी मोहिते (कल्याण)  निता कोल्हटकर (ठाणे), विनीता इरप (ठाणे), वैशाली खत्री (ठाणे), माधव ठाकूरदेसाई (ठाणे), अमिर गोखले (ठाणे), पूनम पोवार (ठाणे)