घराघरांवर आकाशकंदिलांचा लखलखाट, दारापुढे सुंदर रांगोळ्या, आसमंतात प्रकाश पसरवणाऱ्या पणत्या, आनंद द्विगुणित करणारे फटाके, फराळ-मिठाईचा आस्वाद, नरक चतुर्दशीचे पहाटेचे अभ्यंगस्नान आणि सायंकाळी मुहूर्तावर झालेले लक्ष्मीपूजन.. असा आनंद घेऊन आलेल्या दिवाळीचा पहिला दिवस मंगळवारी पुण्यात अशा पद्धतीने साजरा झाला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन असा दुहेरी सण होता. त्यामुळे दिवसभर घराघरात आणि व्यापारी पेढय़ांवर तसेच दुकानांमध्ये व व्यवसायाच्या ठिकाणी दिवाळी साजरी झाली. पहाटे अभ्यंगस्नान झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. सकाळी लवकरच घराबाहेर पडून देवदर्शन आणि परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा असा कार्यक्रम शहरात जागोजागी सुरू होता. सर्व मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी होती. मंदिरांची सजावट रांगोळ्या तसेच पणत्यांनी करण्यात आली होती. शहरातील बागाही नटून आणि पारंपरिक वेश परिधान करून आलेल्या तरुणाईच्या गर्दीने ओसंडून वाहात होत्या. अनेक बागांमध्ये दिवाळीच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होती.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी सहानंतरचा होता. त्याची तयारीही घराघरात आणि व्यापारी पेढय़ांवर सुरू होती. घरोघरी देव्हाऱ्यासमोर लक्ष्मीची प्रतिमा, तसेच सोने-चांदीचे दागिने ठेवून लक्ष्मीपूजन करण्यात आले. व्यापारीवर्गानेही कुटुंबीयांसह मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले. याच दिवशी वहीपूजन करण्याचीही पद्धत असल्यामुळे वहीपूजन तसेच मुहूर्ताच्या पानाचे पूजनही या वेळी करण्यात आले.
व्यापारी पेढय़ांवर पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले जात होते. बत्तासे, साळीच्या लाहय़ा, साखरफुटाणे, पेढे यांचा प्रसादही या वेळी वाटला जात होता. 

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा