News Flash

लक्ष्मीबाई पाटील यांचे कार्य त्यागामुळे अजरामर- डॉ. भांजे

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण शिक्षण संस्थेतील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या भोजन खर्चासाठी गळय़ातील मणिमंगळसूत्राचा त्याग करणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील आपल्या कार्यातून अजरामर झाल्या. त्यांचा आदर्श समाजातील

| April 12, 2013 01:11 am

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण शिक्षण संस्थेतील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या भोजन खर्चासाठी गळय़ातील मणिमंगळसूत्राचा त्याग करणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील आपल्या कार्यातून अजरामर झाल्या. त्यांचा आदर्श समाजातील सर्व घटकांनी घेतला तर नवसमाजाची निर्मिती होईल, असे मत सोलापूर विद्यापीठातील महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक प्राचार्य डॉ. भीमाशंकर भांजे यांनी व्यक्त केले.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्था संकुलाच्या वतीने आयोजित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ८३व्या पुण्यस्मरण सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भांजे हे बोलत होते. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे पुतणे तथा उद्योगपती अण्णासाहेब पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. डॉ. रावसाहेब ढवण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अण्णासाहेब पाटील म्हणाले, लक्ष्मीबाई या माझ्या आत्या होत्या. त्यांनी निस्सीम त्याग केल्यामुळेच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. तळागाळातील व बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली. लक्ष्मीबाईंच्या त्यागमय कार्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा वटवृक्षासारखा विस्तार झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. प्रशांत नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. उत्तमराव हुंडेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्राचार्य दिलीप पाटील, अॅड. जयकुमार कस्तुरे, मिहीर पाटील, रमेश शहा, प्रेमलता चांगले, पर्यवेक्षक भैरव माळी आदी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:11 am

Web Title: laxmibai patils contribution is eternal dr bhanje
Next Stories
1 शिराळा आगाराकडून लांब पल्ल्याच्या एसटी बस
2 बंधाऱ्यावरील वीजपुरवठा एक तास सुरू करण्याचे आदेश
3 पंचगंगा-कृष्णा प्रदूषणासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश
Just Now!
X