07 June 2020

News Flash

रेल्वे स्थानकांना गळती

ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील काही रेल्वे स्थानकांना गळती लागली आहे.

| June 30, 2015 07:26 am

ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील काही रेल्वे स्थानकांना गळती लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना छत्रीचा आधार घेऊन लोकलची वाट पाहावी लागत आहे. ऐरोली, घणसोली, नेरुळ व जुईनगर या स्थानकांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली असून स्थानकातील आसनव्यवस्थाही पाण्याने ओल्या होत असल्याने प्रवाशांनी बसायचे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ऐरोली रेल्वे स्थानकावर प्रवेश केल्यानंतर फलाट क्रमांक दोनवर लोकलची वाट पाहत उभ्या असणाऱ्या प्रवाशांना छतातून गळणाऱ्या जलधारेखाली भिजत उभे राहावे लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती घणसोली रेल्वे स्थानकाची असून स्थानकातील प्रवेशद्वारावर मोठय़ा प्रमाणात गळती सुरू आहे. या ठिकाणी एखाद्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद प्रवाशांना घेता येईल, अशी उपरोधिक टीका प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. जुईनगर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनमधील छतामधून पाण्याची गळती लागली आहे.
नेरुळ स्थानकही या समस्येतून सुटलेले नाही.  ठाणे-वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानके सिडकोने उभारली आहेत. रेल्वे लाइन आणि इंडिकेटर, तिकीट खिडकी या सुविधा रेल्वेने पुरवल्या आहेत. मागील काही दिवसांपासून हार्बर मार्गावरील सिडकोने बांधलेली रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया न झाल्याने त्याची डागडुजी करायची कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिडको मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाळय़ात रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ऐरोली रेल्वे स्थानक हे सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी पावसात अशा प्रकारे गळती सुरू असल्याने आम्हाला एखाद्या आडोशाला उभे राहून रेल्वेची वाट पाहावी लागते. घणसोली रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करत असताना पावसाचे पाणी धबधब्यासारखे पडत असल्यामुळे छत्रीचा आधार घेऊनच रेल्वे स्थानकामंध्ये प्रवेश करावा लागतो.
विनय लोखंडे, सोनल कांबळे, प्रवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2015 7:26 am

Web Title: leakage at railway stations
टॅग Railway
Next Stories
1 उरणमध्ये रानभाज्यांची आवक घटली, दरही वाढले
2 उरणमधील मंगळवारची पाणीकपात रद्द
3 मोरा येथील खाणी धोकादायक?
Just Now!
X