अंबाबरवा अभयारण्यात एका बिबटय़ाची शिकार करण्यात आली असून  या  प्रकरणी वन विभागाने दोघांना अटक केली आहे.
वाघ व बिबटय़ांची शिकार करण्याचे प्रकार वाढत असून शिकार करणारी टोळी पकडणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. गेल्या काही वर्षांत या प्रकरणी तक्रारी वाढल्यानंतर वन विभागाने शिकारींना आळा घालण्यासाठी कडक बंदोबस्त केलाही होता, पण इतके होऊनही काल एका बिबटय़ाची कातडी वन विभागाने पकडली असून या प्रकरणी सोनाळा व टुनकी येथील दोघांना अटक केली आहे. हे दोघेही आरोपी मध्यमवर्गीय असून त्यांची वन कोठडी मिळण्यासाठी अकोट येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. त्यांनी या बिबटय़ाची शिकार कोठे केली व यात आणखी कोण सहभागी आहेत, याची चौकशी वन विभाग करणार असल्याचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी सांगितले.