28 September 2020

News Flash

बिबटय़ाचे कातडे जप्त, संशयितास अटक

सांगली पोलिसांनी लासलगाव पोलिसांच्या मदतीने सोमवारी वनसगाव येथे छापा टाकून प्रल्हाद सुभाष शिंदे याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे तीन वर्षे वयाच्या बिबटय़ाचे कातडे जप्त करून

| March 18, 2014 12:58 pm

सांगली पोलिसांनी लासलगाव पोलिसांच्या मदतीने सोमवारी वनसगाव येथे छापा टाकून प्रल्हाद सुभाष शिंदे याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे तीन वर्षे वयाच्या बिबटय़ाचे कातडे जप्त करून संशयितास अटक केली.
सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बिबटय़ाचे कातडे विक्रीस येणार असल्याची खबर मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार संशयितांना छापा टाकून ताब्यात घेण्यात आले.
संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार वनसगाव येथील प्रल्हाद शिंदे याच्याकडे चार लाख रुपये किंमतीचे बिबटय़ाचे कातडे असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे विश्रामबाग पोलीस कार्यालयाचे उपनिरीक्षक एन. आर. शिंदे, पोलीस कर्मचारी संजय कांबळे यांचे पोलीस पथक लासलगावी दाखल झाले. त्यांनी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्या मदतीने शिंदे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील बिबटय़ाची कातडी जप्त करण्यात आली.
शिंदे यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा कलम ४४, ४८ व ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चौकशीत शिंदे कळवण तालुक्यातील बेज येथे सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता गेला असताना तेथे सांगली भागातील एका प्रशिक्षणार्थीच्या संपर्कात आल्यानंतर बिबटय़ाची शिकार करून कातडे विक्री करणाऱ्या टोळीशी त्याचा परिचय झाला.
यातून बिबटय़ाचे कातडे विक्री करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने शिंदे यांची चौकशी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2014 12:58 pm

Web Title: leopard skin seized 4 suspected arrested
टॅग Smuggling
Next Stories
1 काँग्रेस ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात नाराजी
2 शिवजयंतीनिमित्त मिरवणूक मार्गावरील वाहतूक उद्या बंद
3 दारूसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या
Just Now!
X